Sunday, August 24, 2014

लोकांचे प्रकार

जगात चार प्रकारचे लोक असतात क़ांही लोक दुस-याच्या सुखाने सुखी होतात. ……  त्यांच्या बद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात - तुका म्हणे सुख पराविया सुखे / अमृत हे मुखे स्रवतसे //               काही दुस-याच्या सुखाने दु:खी होतात ,त्यालाच मत्सर असेही म्हणतात …  ,काही लोक दुस-याच्या दु:खाने सुखी होतात …. एकदा एका गावात एक प्रतिष्ठित माणूस गावभर पेढे वाटत होता , पण प्रतिष्ठित माणूस असल्याने कोणाचे पेढे वाटण्याचे कारण विचारण्याचे धाडस  झाले  नाही शेवटी एकाने विचारले तुम्ही का पेढे वाटताय ?  आमदारकीचे तिकीट मिळाले  अपत्य प्राप्ती झाली , लोटरी लागली असे नेमके काय झाले की तुम्ही पेढे वाटताय ? ते म्हणाले की शेजारचा बंड्या   नापास झाला  म्हणून मी पेढे वाटतोय  हा प्रकार आहे दुस-याच्याअ दु:खाणे सुखी
 होणा-यांचा आणि शेवटचा प्रकार की काहे लोक दुस-याच्या दु:खाने  दु:खी होतात त्या लोकां बाबत संत तुकाराम महाराज म्हणतात - सत्य बोले मुखे / दुखवी आणिकांचे दु:खे //

No comments:

Post a Comment