Monday, August 25, 2014

साई बाबा

साई बाबा देव आहेत  का नाहीत  वादाचा विषय आहे . अवतारत्व कोणास द्यावे त्याचे धर्मशास्त्रात खूप विवरण आहे  ,पूर्ण अवतार कोण ,अंश अवतार कोण ,अंशांशावतार  कोण ? इत्यादी बाबत सूक्ष्म विचार धर्मशास्त्रात आहे त्याविषयी कामाचे व बिनकामचे वाद सुरूचं आहेत ………… पण साई बाबांची मंदिर रूपी दुकाने थाटणे हे मला व्यक्तीश: योग्य वाटत नाही . एक परदेशी कंपनी अशी  दुकाने थाटू इच्छिते आहे असे ऐकिवात आहे ……  हे जर सत्य असेल तर याचा नक्कीच  विरोध करावा …………. तसेच शिर्डीस जे बाजारू रूप आले आहे ते सर्व श्रद्धेचा ओंगळवाणा बाजार मांडला आहे असे मला वाटते .                                                                   तसेच संत कोणाला म्हणावे ? ज्याला सत्याची समक्षता लाभलेली आहे त्यास संत म्हणावे …………. ज़्याला खरे काय आहे ते  समजले आहे व त्या ख-या गोष्टिचा अनुभव आला आहे त्यास संत म्हणावे ……। या अर्थाने साईबाबांच्या  चरित्राचा  विचार केल्यास ते संत आहेत व  वंदनिय आहेत .
                  आणि सगळ्यात महत्त्वाचे हे आहे की आपणा आपल्या श्रद्धनीय गोष्टीची पूजा करत असता दुस-यांच्या श्रद्धास्थानांवर संशय ही घेवू  नये व चिखलफेक ही करू नये . व कोणी आपल्या श्रद्धा स्थानावर चिखलफेक केली तर ते पण सहन करू नये ........ हे माझे व्यक्तिगत मत आहे . आपण योग्यायोग्यतेचा विचार करावा . 

No comments:

Post a Comment